Home क्राईम किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेतील कर्जाची रक्कम फेडण्याचे सांगितल्याच्या रागातून महाबळ येथील ४६ वर्षीय महिलेचा विनयभंग केला तसेच महिलेची मुलगी आणि जावई यांना शिवीगाळ करून जीवठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुरूवार २८ मार्च रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील महाबळ परिसरात ४६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता महिलेने श्रीकृष्ण तुकाराम मोंगडे रा. सोनी नगर, पिंप्राळा हा महाबळ परिसरात महिलेकडे आला होता. त्यावेळी महिलेने श्रीकृष्ण मेंगडे याला बँकेचे कर्ज फेडून टाक असे सांगितले. याचा राग आल्याने श्रीकृष्ण मेंगडे यांने महिलेलेा शिवीगाळ करून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच महिलेची मुलगी आणि जावई यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर गुरूवारी २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीकृष्ण मेंगडे यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर हे करीत आहे.


Protected Content

Play sound