धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दहावीचा पेपर देण्यासाठी शाळेत जाताना विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. ती सध्या दहावीचे शिक्षण घेत असून तिचे अंतिम परीक्षा सुरू आहे. या निमित्ताने २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही शाळेत दहावीचा पेपर देण्यासाठी जात असताना संशयित आरोपी किरण संजय पाटील व त्याचे नातेवाईक संदीप संजय पाटील, रेखाबाई गणेश पाटील, गणेश विश्वनाथ पाटील आणि राकेश लोखंडे सर्व राहणार पाळधी खुर्द ता. धरणगाव यांनी तिच्या पाठलाग करून लग्न लावून देण्याचे सांगून तिचे बदनामी केली तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी शुक्रवार २२ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे। त्यानुसार संशयित आरोपी किरण संजय पाटील, संदीप संजय पाटील, रेखाबाई गणेश पाटील, गणेश विश्वनाथ पाटील, आणि राकेश लोखंडे या पाच जणांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहे.