एअरटेल टॉवरच्या साहित्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मोहन नगर परिसरातील नामदेव वंजारी यांच्या शेत गट-४५५ मध्ये लावलेल्या एअरटेल टॉवरचे साहित्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीला आले आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहन नगर परिसरात नामदेव वंजारी यांचे शेत गट क्रमांक ४५५ मध्ये एअरटेल कंपनीचे टॉवर लावण्यात आले आहे. या ज्या ठिकाणी असलेले १४ हजार रुपये किमतीचे साहित्यांची चोरी झाल्याचे उघडतील आले. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी रविंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत कळसकर हे करीत आहे.

Protected Content