Home Cities अमळनेर दोन कुटुंबात तुफान हाणामारी; तीन जण जखमी !

दोन कुटुंबात तुफान हाणामारी; तीन जण जखमी !

0
51


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द गावात काहीही एक कारण नसतांना दोन कुटुंबात लोखंडी सळई व लाकडी काठ्यांचा वापर करत एकमेकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना गुरूवार २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता मारवड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात दोन्ही गटांच्या विरोधात एकुण १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द गावात दोन कुटुंब वास्तव्याला आहे. गुरूवार २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास काहीही एक कारण नसतांना दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यात एकमेंकांना लोखंडी सळई आणि काठ्यांचा वापर करत मारहाण केली. यात मारहाणीत दोन्ही गटातील एकुण ३ जण जखमी झाले आहे. यानंतर दोन्ही कुटुंबांनी रात्री ११ वाजता मारवड पोलीसात धाव घेतली. पहिल्या गटातील बापू हिलाल पाटील वय ४५ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन देवराम पाटील, प्रविण किसन पाटील, मधुकर देवरात पाटील, उदय मधुकर पाटील, शोभा किसन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील हिराबाई मधुकर पाटील वय ६० यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू हिलाल पाटील, हिलाल भटा पाटील, सुशिल निंबा पाटील, निलाबाई हिलाल पाटील, साधना बापू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound