फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय प्राणीशास्त्र विभागांतर्गत जागतिक चिमणी दिवसा निमित्ताने “पक्षी संवर्धन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.विलास बोरोले हे होते. समान्वयिका प्रा.डॉ.सविता वाघमारे कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रसंगी डॉ.राजश्री नेमाडे यांनी चिमण्यांची कमी होत चाललेली संख्या या बद्दल काळजी व्यक्त केली व चिमण्यांच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे असे सांगीतले.
अध्यक्षीय समारोपामध्ये उपप्राचार्य डॉ. विलास बोरोले तसेच चिमणी वाचली पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरी पाणि व धान्याचे दाणे टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वर्षा परदेशी व आभार कु.तेजल वायकोळे यांनी केले. प्रसंगी डॉ.सागर धनगर, प्रा. स्नेहल महाजन, डॉ.नम्रता चौधरी, प्रा.युवराज चोपडे, प्रा.गुणवंती धांडे, प्रा.उज्ज्वला ठोसरे, प्रा.पूजा मेढे, प्रा.उत्कर्षा कोल्हे, श्री देविदास तायडे, श्री दिलीप मेढे,श्री गणेश चव्हाण यांनी सहकार्य केले.