त्या उपोषणाला मविआचा पाठींबा; प्रशासनाच्या कारभाराचा केला निषेध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीमधील निधीचा अपहार प्रकरणाची चौकशीसाठी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला महाविकास आघाडीच्या वतीने पाठींबा देण्यात आला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभराचा निषेध करण्यात आला.

यावल तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतीच्या झालेल्या लाखो रुपयांच्या झालेल्या अपहारप्रकरणी संबधीतांनी दिलेल्या  अहवाल वरून चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी यावल पंचायत समिती च्या,कार्यालया समोर आमरण उपोषणास बसलेले पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असुन, आज सकाळी यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी वैद्यकीय सुत्रांच्या सुचने वरून उपोषणार्थींच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने तात्काळ त्यांना पोलीस प्रशासनाने उपोषणाच्या स्थळी रूग्णवाहीका आणुन उपोषणकर्ते सलीम मुसा तडवी व रहेमान रमजान तडवी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यांची प्रकृती अधिक गंभीर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे  वैद्यकीय सुत्रांकडुन सांगण्यात आले आहे .

 

दरम्यान उपोषणांच्या ठीकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले असुन जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित एस .पाटील यांची आमदार शिरीष चौधरी व आदी पदाधिकारी यांच्या शिष्ठ मंडळाने भेट घेतली असता सावखेडा सिम ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहारा प्रकरणी चौकशी विशेष लेखापरिक्षण करण्यात येणार असुन येत्या आठ दिवसात संबधीत अपहारा प्रकरणीचा लिखित अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी आमदार शिरीष चौधरी,माजी खासदार डॉ उल्हास पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहीणी खडसे खेवलकर ,माजी आमदार रमेश चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यानी व पदाधिकारी यांनी उपोषणाच्या ठीकाणी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला आहे . याप्रसंगी उपोषणाच्या ठीकाणी उपास्थित ग्रामस्पंथांनी पंचायत समिती प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे .

 

Protected Content