मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यासह देशात निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहे त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी सुरू करत आहे त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमश्या पाडवी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर हा विडिओवर टाकत असल्यामुळे त्याचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणे निश्चित आहे.
आमश्या पाडवी हे शिवसेनेच्या नंदूरबार जिल्हयातील आदिवासी नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. त्यांनी नंदूरबार जिल्हयात शिवसेना पक्ष पोहचविण्यासाठी मोठे कष्ट घेतलेले आहे. २०२२ साली ते विधानपरिषदेचे आमदार झाले आणि त्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडात साथ दिली नाही, पण आज ते शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीला नंदूरबार लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार आहे त्यामुळे आमश्या पाडवी हे नाराज होते, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकिटाची मागणी ही केली होती. त्यामुळे ते आता शिंदे गटात प्रवेश करून तिकिटाची मागणी करू शकतात