बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात 03 मार्च 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय लोक अदालीतीचे आयोजन मा.सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आले. यात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तडजोडीतून न्याय मिळाला व पुन्हा नंव्याने तुटळेले संसार व दुभंगलेली मने पुन्हा जोडण्याचे काम लोकअदालतीने केल असे प्रतिपादन ॲड. अर्जुन पाटील यांनी केले. यामध्ये दिवाणी, तडतोडपात्र, फौजदारी, मोटार अपघात, नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, भुसंपादन, बँका, वित्तीय संस्था तसेच शासकीय अस्थापनांची थकीत वसुली अशी दाखलपुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आले. त्यासाठी वित्तीय संस्था, बँका, महावितरण, महापालिका, जिल्हा परिषद, विमा कंपन्या, शासकीय कार्यालये यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेऊन पूर्व तयारी करण्यात आली आहे.
लोक अदालतीसाठी प्रलंबित, व दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. यावेळी सदर लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी असे एकुण 6 व दाखल पुर्व दावे यामध्ये 7 असे एकुण 13 प्रकरणामध्ये तडजोड झाली. तसेच 6,55,720/- रू. वसुली झाली. तर विद्युत मंडळाच्या 12 प्रकरणामध्ये 2,12,410/- रक्कम वसुल झाली एकुण 8,68,130/- वसुल करण्यात झाले. तसेच सदर लोक अदालतीमध्ये ज्या जोडप्याचे समजोता होवुन नांदण्यास घेवुन जाण्यऱ्या पती-पत्नीचे गुलाब पुष्प देवुन स्वागत करण्यात आले व त्याना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. कार्यक्रमास मंचावर प्रमुख उपस्थिती – बोदवड तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अर्जुन टी. पाटील, पंच ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड. संतोषकुमार कलंत्री, ॲड.के.एस.इंगळे हे होते. तसेच यावेळी वकील संघा कडुन तालुक्यातील राष्ट्रीय बॅकेचे, सेन्ट्रल बॅकेचे विभागीय व्यवस्थापक नरेद्र गंर्ग, ज्ञानेश्वर उमरटकर, जयेश गंगवार, संदेश पाटील, अविनाश सोनवणे, वीज महामडंळचे अर्जुन सोळुके , महसुल विभाग अधिकारी वर्ग तसेच ॲड.अमोलसिंग पाटील, ॲड.किशोर महाजन, विधी प्राधिकरण योगेश पाटील, शैलेश पडसे, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.डी.महाजन, हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन ॲड.के.एस.इंगळे यांनी केले.