धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमधील इ.५ वीच्या विद्यार्थांनी मराठी विषयांतर्गत असलेल्या ‘हत्तीचा मुखवटा’ या कृतीयुक्त पाठातील मुखवटे तयार करून परिधान केले. आधीच्या अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण दिले जात होते ज्यामध्ये शालेय जीवनात विद्यार्थांना स्त्री पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता इ. मूल्ये शिकवली जात होती.
कार्यानुभव विषयांत विविध कृतीयुक्त अध्यापन शिकवलं जायचं. कार्याचा अनुभव देणारा विषय म्हणजे कार्यानुभव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या सर्वांमध्ये मराठी विषयांत आलेला कार्यानुभव भाषिक दृष्टीने विद्यार्थांना समृध्द करत असतो. असाच एक पाठ स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमच्या इ.५ वीच्या मराठी विषयांतर्गत आहे. गुड शेपर्ड स्कुलमधील इ.५ वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर हत्तीचे मुखवटे बनवून डोळ्यांचे पारणे फेडले. मुलांनी तयार केलेले मुखवटे परिधान केल्यानंतर सर्व शोभून दिसत होती. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, ५ वीच्या वर्गशिक्षिका गायत्री सोनवणे आणि मराठी विषय शिक्षक लक्ष्मणराव पाटील विद्यार्थांसमवेत उपस्थित होते.