जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवाशक्ती संगम कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाहा हे जळगावात आले असून विमानतळावर त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज जळगावात येत असून त्यांच्या उपस्थितीत युवाशक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाहा हे तरूण कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यानंतर ते लोकसभा निवडणुकीबाबत नेते व पदाधिकार्यांच्या सोबत चर्चा देखील करू शकतात. या कार्यक्रमासाठी पक्षाच्या वतीने अतिशय अचूक असे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज दुपारी अमित शाहा यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी आदींनी स्वागत केले. यानंतर अमित शाहा यांचा ताफा सागर पार्क मैदानाकडे रवाना झाला आहे.