पणन महासंघाच्या निवडणुकीत आ. संजय सावकारे विजयी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पणन महासंघाच्या झालेल्या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.

महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली, बहुतांश जागा या बिनविरोध झाल्या होत्या पाच जागांची निवडणूक ही बाकी होती. यानंतर सहकार पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्यात आली, पाचीच्या पाच जागेवरती सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. यात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी देखील दणदणीत विजय संपादन केला आहे.

आमदार सावकारे यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. यात पक्षाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, निक्की बत्रा यांच्यासह पदाधिकारी आणि सहकार्‍यांनी जोरदार जल्लोष करून या विजयाचे स्वागत केले.

या संदर्भात बोलतांना आमदार संजय सावकारे म्हणाले की, पहिल्यांदाच मी या निवडणुकीच्या मैदानात उभा राहिलो होतो ,आणि निवडून ही आलो. या निवडणुकीच्या मैदानात पाच उमेदवार उभे होते पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातून मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा होतो, राखीव जागांसाठी ही निवडणूक लागली होती, बाकीच्या जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या, तीन तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली, आणि आज त्याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पाचच्या पाची जागा या सहकार पॅनलच्या निवडून आले आहेत, एकूण ६०० मतदान होते, त्यापैकी ५५३ मतदान झालं, यापैकी ३१० मतदान हे मला झाल्याने मी निवडून आलो, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.

Protected Content