Home क्राईम किरकोळ कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी

किरकोळ कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी


जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| तालुक्यातील ममुराबाद गावात राहणाऱ्या एका महिलेला एकाने तिच्या पतीला बघून त्यांना अश्लिल शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याची घटना गुरूवारी २९ रोजी सकाळ १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. गुरूवारी २९ रोजी सकाळ १० वाजेच्या सुमारास महिला या त्यांच्या घरासमोर उभ्या असतांना गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद, ता. जळगाव) या संशयिताने महिलेच्या पतीला बघुन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने महिलेला देखील अश्र्लिल शिवीगाळ करीत त्यांच्या विनयभंग केला. दरम्यान, महिलेने तात्काळ तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी दीड वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound