जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाल्मिक नगरात अवैधरित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत लोखंडी तलवारीसह अटक केली आहे. त्यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बाबूराव तायडे रा. वाल्मिक नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मिक नगरात सोमवारी रात्री संशयित आरोपी विजय तायडे हा बेकायदेशीरपणे हातात लोखंडी तलवार घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने तात्काळ वाल्मिक नगरात जावून संशयित आरोपी विजय तायडे याला अटक केली. त्याच्याजवळू लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय खैरे, पो.कॉ. राहूल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, मुकुंद गंगावणे यांनी केली.