अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-केंद्रीय मार्ग निधी (CRIF) अंतर्गत राज्य मार्ग ३९ ते जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे या रस्त्याची सुधारणा करणे केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून या कामाची अंदाजित किंमत 47 कोटी 54 लाख मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
सदर मंजुरी साठी मंत्री अनिल पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 12 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात या रस्त्याचा समावेश झाला असून सदर मार्गावर राज्य मार्ग 39 पासून एम डी आर 51 किमी 5/200 ते 25/600 यादरम्यान 20.400 एवढ्या रस्त्याचे हे काम होणार आहे.सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ना गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. उन्मेष पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान अमळनेरच्या इतिहासात केंद्रीय मार्ग निधीतून प्रथमच एवढ्या मोठया प्रमाणात निधी मिळाल्याने मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले जात आहे.