लोकमान्य सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनल यांच्यात होणार सामना
साकेगाव-जितेंद्र पाटील/युवराज पाथरवट । साकेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पडसाद चांगलेच वाजू लागले आहे. ही निवडणूक दोन्ही पॅनलसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने निवडणूकीत सत्ता कोणाच्या हाती येते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
साकेगाव विकासो ही संस्था साकेगाव, जोगलखेडा, भानखेडा व भुसावळला लागून असलेला सातारा येथील भागातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेअर असल्याने ही संस्था नेहमीच अनेकांचे केंद्रबिंदू असते. म्हणून साकेगावची सोसायटीत येणाऱ्या १८ फेब्रुवारी रोजी कोणाची सत्ता येते याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.
साकेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गेल्या निवडणूकीला मतदार राजाला २-२ हजार रुपये वाटल्याचे गावात दाबके आवाजात चर्चा असल्याचे बोलले जात होते. तसेच यावेळेस सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणारे उमेदवार हे पैसे वाटणार का अशी सुद्धा उलट सुलट गावात चर्चा आहे.तरी या वेळेत प्रत्येकाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे तरी जोगळखेळा आणि भानखेड्याच्या निर्मितीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राजेंद्र बारकू पाटील यांना चेअरमन आले होते. तर आता होत असलेल्या निवडणुकीत कोण निवडून येतो आणि कोण पडतो जेणेकरून या निवडणुकीत आपापल्यास परिवाराकडून अनेक जण उभे असून कोण या निवडणुकीत निवडून येतो हे येणाऱ्या १८ फेब्रुवारी रोजीच्या निकालातून चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत सत्ता कुणाची यात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनल शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून लोकमान्य सहकार पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीत लढत चालू आहे.