जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय किसान काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा. सुकलाल पाटील यांनी जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली. या झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तरी आपण सरसकट पंचनामे करून तात्काळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानातून इ-पीक पेरा नसलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. तरी या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन अनुदान यादीत नाव आलेले नाही. आपण लवकरात लवकर याची नोंद घ्यावी व या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन टाटा इशा कंपनीच्या कापूस बियाण्याची लागवड केलेली आहे. १२० दिवस झाले तरी पिकाला कोणतेही फळ नाही. तरी याची तात्काळ दखल घेऊन संबन्धित कंपनीवर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये अनेक वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या पोर्टल वर ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत तरी त्या शेतकऱ्यांना तात्काळ विम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी ही विनंती

राज्यातील “सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेत प्रती शेतकरी २ हेक्टर च्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रु.५०००/- प्रती हेक्टर च्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने कृषि विभागामार्फत घेतलेला आहे. यासाठी ई-पिक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषि विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रशित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उता-यावर कापूस / सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणावरून प्राप्त झाल्याची बाब कृषि विभागाने महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत याकरीता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. खरीप हंगाम २०२३ च्या ७/१२ उता-यावर नोंद असून ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदारः- खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय ई पिक पाहणी यादी वरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर १२ वरून या ई-पिक पाहणी यादीत नसलेल्या परंतु त्यांचे ७/१२ वर कापूस / सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतक-यांची यादी खालील नमुन्यात करावी आणि ती सही करून संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांना देण्यात यावी.

बनपट्टेधारक यांना मदत देणे: राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले आहेत अशा वनपट्टे धारकांपैकी ज्या वनपट्ट्यावर खरीप २०२३ हंगामात कापूस किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांच लागवड केली होती याबाबतची गावनिहाय वनपट्टा क्रमांक, वनपट्टा धारक पूर्ण नाव, कापूस व सोयाब पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती खालील तक्त्यात संकलित करून जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी यांनी यादी अंतिम करून कृषी विभागास देण्यात यावी.