जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालय, जळगांव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केशवराव भोईटे व्याख्यानमालेचे अंतर्गत रघुजीराजे आंग्रे, अध्यक्ष श्री. छत्रपती शिवाजीराजे रायगड मेमोरीयल मंडळ, पुणे यांचे “स्वराज्याचे आरमार” या विषयावर १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता गंधे सभागृह, जळगांव येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध युद्धनीती तसेच, आरमाराविषयी सविस्तर माहिती व्याख्याते रघुजीराजे देणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच छत्रपती शिवाजीराजे प्रेमीनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण प्र. देशमुख यांनी केले आहे.