Home क्राईम डीजेच्या आवाजामुळे वधूच्या आजीचा मृत्यू

डीजेच्या आवाजामुळे वधूच्या आजीचा मृत्यू


नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धार्मिक, राजकीय आणि लग्नसमारंभात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी डीजे आणि नाचगाण्यांचा मोठा ट्रेंड आहे. याशिवाय आयोजकांना लग्नात हवी तशी मजा येत नाही, असेच दिसते. या डीजेमुळे एका ६५ वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची घटना निवघा परिसरात घडली आहे.

निवघा बाजार परिसरातील शिवरकर यांच्या लग्नाची वरात मंगळवारी (ता.१३) डीजेच्या तालावर मोठ्या आनंदात निघाली होती. यावेळी डीजेच्या मोठ्या आवाजात गाण्याच्या तालावर तरुण मंडळी नाचत होती.

त्यांच्या पाठीमागे वऱ्हाडी मंडळींमध्ये वयोवृद्ध पुरुष, महिला, लहान मुले सामील होती. लग्नाची वरात निवघा बसस्थानक परिसरात आली अन् डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नवरीच्या आजी मुक्ताबाई गोविंद शिवरकर (वय ६५) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्या खाली कोसळल्या. उपस्थितांनी ऑटोमधून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना लग्नमंडपात समजताच शोककळा पसरली.


Protected Content

Play sound