Home Cities धरणगाव धरणगावात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

धरणगावात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप


20190621 194613
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पद्मश्री भवरलाल भाऊ जैन सार्वजनिक वाचनालयातर्फे धरणगाव परिसरात राहणाऱ्या आदिवासी, भिल्ल अशा गरीब विद्यार्थ्यांना नुकत्याच जैन इरिगेशन यांच्या सौजन्याने मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे पालक रोडवर खडी फोडायचे काम करतात. तर काही जण विहिरीच्या खोदकामचे काम करतात. अशा गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे. तसेच त्यांच्या शिक्षणाच्या दर्जा उंच व्हावा, यासाठी त्यांना वाचनालयातर्फे दरवर्षी मोफत वह्या वाटप करण्यात येतात. या आधी अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करण्यात आले आहे. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, ग्रंथालय संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेशभाऊ पाटील तसेच नंदू पाटील, अनिल बडगुजर, दिनेश भदाणे, कल्पेश महाजन, विशाल देवरे, राकेश पाटील हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound