भाजप जिल्हाध्यक्षपदी डॉ.संजीव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी शुक्रवारी आपला राजीनामा दिल्यानंतर भडगावचे डॉ.संजीव पाटील यांची आज अधिकृतपणे भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड घोषित केल्याचे वृत्त आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेरमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि भाजपचे माजी आमदार डॉ. बीएस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली होती. या प्रकरणामुळे जिल्हा भाजपातील गटबाजी उफाळून आली होती. तेव्हापासूनच श्री.वाघ यांना राजीनामा द्यावा लागेल,अशी चर्चा सुरु होती. परंतू लोकसभा निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर कौटुंबिक व्यस्ततेचं कारण देत श्री. वाघ यांनी आपला राजीनामा प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपविला होता. त्यानुसार वाघ यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, भडगावचे डॉ.संजीव पाटील यांची आज अधिकृतपणे निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content