सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । १५ वी मिनी सब जुनिअर धनुर्विद्या स्पर्धा दिनांक २८ ते ३० जानेवारी 202४ दरम्यान हिंगोली (औंढा नागनाथ) येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये धनुर्विद्या रिकर्व्ह प्रकारात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदाची विद्यार्थिनी जिज्ञासा प्रशांत भारंबे हिस ओव्हर ऑल कांस्यपदक मिळाले आहे. एलिमिनेशन प्रकारात कांस्यपदक असे एकूण दोन कांस्य पदक मिळाले व पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली.
या वर्षी तिला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. सध्या ती प्रशिक्षक अमर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचा नियमित सराव करत असते. तिला धनुर्विद्या खेळाडू निशांत राठोड, ओम कोळी यांचे वारंवार मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. तिच्या यशासाठी आमदार चंद्रकांत पाटील, गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, तसेच शाळेच्या प्राचार्या भारती महाजन, प्रशिक्षक अमर जाधव सर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.