रावेर वन विभागाकडून वृक्षारोपण

raver tree plantation

रावेर प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रावेर वन आगार परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रावेर वनपरिक्षेत्र कार्यालय यांचे कडून वन आगार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष या मोहिमेची जन जागृती करण्यात आली. याप्रसंगी पोलीस उप विभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, न. पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पोलिस उपधीक्षक श्री पिंगळे यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आपण पर्यावरण पूरक बाबी अंगीकारण्याचे देखील आवाहन त्यांनी केले. तहसीलदार श्रीमती देवगुणे यांनी विचार मांडतांना म्हटले कि, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण वृक्ष आणि वन्य जीव संरक्षण करण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून पुढाकार घेणे आवश्यक आहे. वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी आगामी जुलै महिन्यात राबविण्यात येणार्‍या एकच लक्ष ३३ कोटी लक्ष या मोहिमेची माहिती दिली.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वनपाल संजय भदाणे, श्री ठोसर, यशवंत पाटील, श्री सदावर्ते, रोहिणी थोरात, हरेश थोरात, सोपान बडगणे, सुनील महाजन, दिगंबर सुरळकर,दीपक नगरे,यांच्यासह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content