यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचालीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये फन फेअर चिमकुल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुन्दर कार्यक्रमांनी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून यावल शहराचे तलाठी ईश्वर कोळी, महसूल विभागाचे सुरज जाधव, आरती धनगर तसेच स्कूलचे चेअरमन राजेंद्र महाजन, शाळा सदस्य शशिकांत फेगडे व मिलिंद भालेराव इत्यादीना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथम उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर शशिकांत फेगडे व शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन उत्कृष्ट असे खाद्यपदार्थ बनवून आणले होते व अत्यंत छान प्रकारे स्टॉल सुद्धा सजवण्यात आले होते. सर्वच प्रमुख अतिथींनी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकुशलतेचे कौतुक केले.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य तसेच व्यवहार चातुर्य दिसून आले. विद्यार्थी खाद्यपदार्थ विकताना अत्यंत उत्साहित होऊन आपले कौशल्य सादर करत होते. या कार्यक्रमास सर्व पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व पालकांनी सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पाडण्यास सहकार्य केले .राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फेगडे व सर्व शिक्षक-कर्मवारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिना निंबाळे व जागृती चौधरी यांनी केले. अशाप्रकारे आजचा फन फेअर कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला .