Home Cities यावल १०वी-१२वीच्या परिक्षेला निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ

१०वी-१२वीच्या परिक्षेला निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ

0
40


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षेसाठी येत्या फेब्रुवारी-मार्च २०२४ विद्यार्थ्यांना आता १० मिनिटे वाढवून मिळणार आहे. १० वी व १२वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

इ. १० वी व इ.१२वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्न पत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा होती, पण फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. तथापि विद्यार्थी हित लक्षात घेऊन पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.

सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेची सध्याची वेळ स. ११.०० ते दु. २.०० सुधारित परीक्षेची वेळ ११.०० ते दु. २.१०. दुपार सत्र ३.०० ते ५.०० सुधारित वेळ ३.०० ते ५.१० म्हणजे दहा मिनिट ज्यादा वेळ हा निर्धारित वेळेनंतर मिळणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे राज्य सचिव अनुराधा ओक यांनी पत्रांवर कळवले आहे


Protected Content

Play sound