मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज अर्थात ‘अटल सेतू’ चे काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 जानेवारीला हस्ते हे उद्घाटन पार पडले. त्यानंतर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र हा पूल सुरू होऊन अवघे 10 दिवसही दिवस उलटत नाहीत तोच त्यावर पहिला अपघात झाला. ‘अटल सेतू’ वर एका कारचा भीषण अपघात झाला असून त्याचे थरारक व्हिज्युअल्स समोर आले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून ती उलटी-पालटी झाली आणि डिव्हायडरवर जोरात धडकली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितनाही झालेली नाही. पण या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या कारचालकांनी सावधानतेने गाडी चालवावी असा इशारा देण्यात येत आहे. अटल सेतूवर वाहने वेगाने धावत होती, तेव्हा एक चालक व्हिडीओ शूट करत होता. तेवढ्याच त्याच्या मागून डाव्या बाजूनने एक मारूती इग्निस कार वेगाने आली आणि भरधाव वेगाने पुढे गेली.
मात्र कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस जाऊन डिव्हायडरला धडकली आणि तशीच पुढे जाऊन उलटी-पालटी झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण कारचे बरेच नुकसान झाले. हे शूटिंग करणारा चालक पुढे जाऊन हळूहळू थांबला आणि कारमधून उतरून अपघातग्रस्त कार चालकाला मदत करायला पोहोचला. या अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.