Home Cities यावल यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीत ८८ अर्ज वैध

यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीत ८८ अर्ज वैध


८४ उमेदवारांनी भरले अर्ज; महाविकास आघाडीसह महायुतीचा निवडणुकीत प्रवेश

यावल-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली असुन या तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांनी यात प्रवेश घेतला असुन येत्या २४ जानेवारी रोजी होणाऱ्या माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

यावल खरेदी विक्री सहकारी संघाची दिनांक ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीनंतर ८४ उमेदवारांचे ८८ अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. या निवडणुकीत एकुण १७ संचालक निवडीसाठी २हजार८७३ मतदार व सहकारी सोसायटीचे ४५ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, यात शेतकी संघाच्या व्यक्तिशः मतदारसंघासाठी पाच जागांसाठी ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. सोसायटी मतदार संघाच्या ७ जागांसाठी २४ अर्ज, अनुसुचित जाती -जमातीच्या १ जागासाठी ३ उमेदवारांचे अर्ज, ओबीसी मतदारसंघाच्या १ जागासाठी १२ अर्ज, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या १ जागासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल आहे , अनुसुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ५ अर्ज प्राप्त झाले असुन , महिलांच्या राखीव २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले आहे . सहाय्यक निबंधक सहकार संस्था कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर मोरे हे निवडणुक निर्णय अधिकारी हे काम पहात आहे.


Protected Content

Play sound