विधानभवनच्या कॅन्टिनच्या मटकी उसळमध्ये आढळले चिकनचे तुकडे

Vidhan Bhavan Canteen chikan

 

मुंबई (वृत्तसंस्था) विधानभवनच्या कॅन्टिनमधील मटकीच्या उसळमध्ये चक्क चिकनचे तुकडे आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना जेवताना हे चिकनचे तुकडे आढळले.

 

आज दुपारी सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळची थाळी मागवली होती. यावेळी उसळमध्ये त्यांना चिकनचे तुकडे आढळले. मनोज लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देत तक्रार केली आहे. मनोज लाखे यांनी याप्रकऱणी कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.दरम्यान कॅन्टिंग पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल मनोज लाखे यांची माफी मागितली. जाणुनबुजून हे घडलेले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे कॅन्टिनमध्ये आमदार, नेते, पोलीस आणि पत्रकारांची चांगलीच गर्दी असते. त्यातच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Protected Content