Home Cities जळगाव पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन गोसावी यांची निवड

पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन गोसावी यांची निवड

0
123


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दूरदर्शन सह्याद्री वाहिनी तसेच पुढारी न्यूज वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी सचिन गोसावी यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मिडिया विंग च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी पदी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे रिपोर्टर सचिन गोसावी यांची आज दिनांक २५ डिसेंबर रोजी निवड करण्यात आली आहे.

पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी नियुक्ती केली आहे. निवडीबद्दल खानदेश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा,प्रमोद सोनवणे,शरद कुळकर्णी, कमलेश देवरे,योगेश चौधरी, प्रमोद रुले, विकास पातळे यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्तीबद्दल सचिन गोसावी यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound