मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार : २८ मंत्र्यांनी घेतली शपथ

भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी राजभवन येथे आयोजित समारंभात १८ कॅबिनेट मंत्री, सहा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि चार राज्यमंत्र्यांना शपथ दिली. आज एकूण २८ मंत्र्यांनी शपथ घेतली.

आजच्या कार्यक्रमात १८ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यात विजय शाह, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, राकेश सिंग, करण सिंग वर्मा, उदय प्रताप सिंग, संपतिया उईके, तुलसीराम सिलावत, एडल सिंग कंसाना, निर्मला भुरिया, गोविंद सिंग राजपूत, विश्वास सारंग यांचा समावेश होता. तर राजभवन, नारायण सिंह कुशवाह, नागर सिंह चौहान, प्रदूम सिंग तोमर, राकेश शुक्ला, चेतन कश्यप, इंदर सिंग परमार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

त्याचवेळी सहा आमदारांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. यामध्ये कृष्णा गौर, धर्मेंद्र लोधी, दिलीप जैस्वाल, गौतम टेटवाल, लखन पटेल आणि नारायण पवार यांचा समावेश आहे. याशिवाय राधा सिंह, दिलीप अहिरवार, नरेंद्र शिवाजी पटेल, प्रतिमा बागरी यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Protected Content