डोणगावाची भारती पाटील सहकार खात्यात अधिकारी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डोणगाव (ता. धरणगाव) येथील भारती पाटील या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधकपदाच्या (सहकार) परीक्षेत यश संपादन केले. विशेष म्हणजे, भारतीने त्यासाठी कुठलाही क्लास तिने लावला नव्हता.केवळ रात्रंदिवस अभ्यास व जिद्द आणि चिकाटी ठेवून ती सहकार खात्याची अधिकारी बनल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारती पाटील हिचा बारावीनंतर इंजिनिअरिंगला नंबर लागला होता. मात्र, परिस्थितीमुळे तिने इंजिनिअरिंग न करता, जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातून २०१८ मध्ये गणितात बी. एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी आई-वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले.

‘एमपीएससी’मध्ये पहिल्या दोन प्रयत्नात तिला काहीसे अपयश आले व त्यामुळे खचून न जाता तिने आपले प्रयत्न सुरुच ठेवले. २०२२ मध्ये दिलेल्या परीक्षेत तिने अखेर यश संपादन केले. २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. मात्र, मैदानावर सरावात तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने ही संधी हुकली होती.

त्यानंतर मुख्य परीक्षेच्या काळात काही दिवस पुणे येथील श्रेयस बढे यांचे तिने ऑनलाईन मार्गदर्शन घेतले. एवढ्यावरच भारतीने हे यश संपादन केले. भारती ही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांची मुलगी आहे.

रवींद्र पाटील हे सातत्याने लोकसेवेत राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते घरात कमी आणि बाहेर जास्त राहणारा माणूस म्हणून रवी दादा यांची गणना राष्ट्रवादीच्या चममध्ये होते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे निकटवर्ती म्हणून रविदादांची ओळख आहे त्यांच्या जनसंपर्क आणि जनतेची सेवा याची पुण्याई म्हणून मुलीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असं जनमानसात बोलले जाते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे कोणत्याही क्लास नाही बाहेर शिकवणी वर्ग नाही मात्र जिद्द परिश्रम आणि सखोल अभ्यासाच्या बळावर कुमारी भारतीने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. धरणगाव तालुक्यात ग्रामीण भागामध्ये सर्वत्र कु. भारतीच्या यशाचं कौतुक होत आहे ठिकठिकाणी भारतीय सह तिचे वडील रवींद्र पाटील यांचा गौरव आणि निमित्ताने होत आहे

भारती अभ्यास करायची त्यावेळी तिची ८२ वर्षीय आजी रात्रभर जागून होती. वडिलांची परिस्थिती, लहान भावाचे शिक्षण या सर्व बाबींचा विचार करून कमीत कमी खर्चात शिक्षण घेता यावे यासाठी तिने इंजिनिअरिंग न करता, बी. एस्सी.ला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतल्याचे सांगितले. घेतला सर्व वरिष्ठांचे आशीर्वादाने माझी जिद्द आणि चिकाटी आई-वडिलांचा, आजीची प्रेरणा यामुळे हे यश प्राप्त झाले असे भारतीने सांगितले.

Protected Content