Home Cities जळगाव २४ डिसेंबरला हिेंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

२४ डिसेंबरला हिेंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

0
77


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधूता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्यात देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे, मात्र बहूसंख्य हिंदूना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सरकारी अनुदान, तर हिंदूना भगवत्गीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे ! देशभरात केवळ हिंदूच्याच मंदिराचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवी संकट हलाल जिहाद यांसारख्या हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच अयोध्येत आता प्रभू रामचंद्र यांचे भव्य मंदिर उभे राहत आहे, तर आता हिंदू राष्ट्र अर्थात रामराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे हिंदू राष्ट्र- जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी दिली. ते पदृमालय रेस्ट हाऊस जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरू नंदकुमार जाधव, अधिवक्ता परिषदेचे ज्येष्ठ अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले यांनीही संबोधित केले.

ते पुढे म्हणाले की, या सभेत प्रमुख वक्ता म्हणून प्रथितयश चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक तसेच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सनातन संस्थेचे सद्गगुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र-छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घरवट हे संबोधित करतील.

या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणार फलक, क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, काश्मीरी हिंदूवर झालेल्या अत्याचारांचे फलक, यांसह हिंदुंना प्रतिदीन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. सनातनी अनमोल ग्रँथ संपदा येथे उपलब्ध असेल.

सभेसाठी जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, धरणगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा, पारोळा, जामनेर, अमळनेर या तालुक्यातील अनेक गावात प्रत्यक्ष प्रसार करण्यात आला असून गेले महिनाभर विविध तरूण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदूत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तिपत्रके, हस्तपत्रके, होर्डिग, फलकलेखन, रिक्शा, उद्घोषणा, सामाजिक प्रदर्शित करत आहेत. विधि क्षेत्रातील लोकांचाही यात सहभाग आहे.

सभेनिमित्त २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे, नेहरू चौक, जळगाव येथून फेरीला प्रारंभ होईल, टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय, काव्य रत्नावली चौक, नूतन मराठा महाविद्यालय या मार्गाने जाऊन शिवतीर्थ मैदान येथे समारोप होईल.


Protected Content

Play sound