Home राष्ट्रीय मोठी बातमी : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग ?

मोठी बातमी : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग ?

0
103

कराची-वृत्तसंस्था | कुख्यात डॉन तथा मुंबई बॉंब स्फोटातील मास्टरमाईंड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर कराचीत विषप्रयोग झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दाऊद इब्राहिम याला सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो कराचीतील क्लिप्टन या आलीशान परिसरात राहत असून त्याच्या भोवती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसह त्याच्या खासगी सुरक्षारक्षकांचा कायम कडेकोट बंदोबस्त असतो. भारताने या संदर्भात युनोमध्ये अनेकदा दावे केले असले तरी पाकने याला कायम फेटाळले आहे.

दरम्यान, दाऊदला कराचीतील एका मोठ्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त स्थानिक पातळीवरील सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आले आहे. कराचीतील रूग्णालयात त्याला दोन दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या संदर्भात अजून कुठलही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने त्याच्यावर खरंच विषप्रयोग झाला की नाही ? याबाबत कळू शकले नाही. तथापि, सोशल मीडियात हा विषय ट्रेंडींगला आला आहे.


Protected Content

Play sound