रिक्षा चालकाला मारहाण करून जबरी लुट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एका कंपनीसमोर रिक्षा घेऊन उभे असताना गोपाल एकनाथ शिंदे (३७, रा. मुकळी फाटा, ता. धरणगाव) यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पाकीटामधील ३५०० रुपये व महत्त्वाचे कागदपत्र दोन जणांनी चोरून नेले. ही घटना ८ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालक असलेले गोपाल शिंदे हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीसमोर उभे असताना तेथे दुचाकीवर दोन जण आले व त्यांनी शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीटामधून ३५०० रुपये, आधार कार्ड, रिक्षाचे आरसी बुक, वाहन परवाना काढून घेतला व रिक्षाचालकाला ढकलून देत पळून गेले. या प्रकरणी शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि नीलेश गोसावी करीत आहेत.

Protected Content