


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवराणा नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला पैशांची मागणी करत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सासरी मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील शिवराणा येथील माहेर असलेल्या पुजा जीवन माने वय-३३ यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील जीवन सुरेश माने यांच्याशी नोव्हेंबर २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून पैशांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, सासरे, ननंद आणि इतरांना मानसिक व शारिरीक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर मंगळवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पती जीवन सुरेश माने, सासु सिंधू सुरेश माने, सासरे सुरेश तुकाराम माने तिघे रा. चिखली ता. बुलढाणा, सोनिया अजय सवळतकर, अजय भगवान सवळतकर दोन्ही रा. मोताळा ता.बुलढाणा आणि दिर विजय सुरेश माने रा. धामणगाव ता. बुलढाणा यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण हे करीत आहे.



