Home प्रशासन समता फाऊंडेशनतर्फे मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर

समता फाऊंडेशनतर्फे मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान वाघोदा येथे नुकत्याच नवयुक्त निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त समता फाउंडेशन मुंबई व ग्रामपंचायत कार्यालयात  आयुष्मान भारत गोल्डन कार्ड   शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यात ३८० नागरिकांनी फायदा घेतला . तसेच डोळ्यांची तपासणी  करण्यात आली. यात १०५ नागरिकांनी फायदा घेतला मोतीबिंदू असल्यास ऑफरेशन करून दिले जाईल. तरी यात १५ ते २० जणांना ऑफरेशन साठी चार ते पाच दिवसात पाठविले जाईल . तरी गरजूंनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेतला.

यावेळी समता फाउंडेशन मार्फत आयुष्यमान कार्ड साठी अतुल महाजन, डिगंबर चौधरी, सागर महाजन, राहुल बोंडे, राहत तडवी तर डोळ्यांची तपासणी डॉ. ठोंबरे व चेतन दुसे यांनी सहकार्य केले. यावेळी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी, सदस्य दमयंती शिंदे, वंदना कोलते, पुजा कोलते, रुपाली कोलते, फातमा तडवी, जितेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound