Home धर्म-समाज अविनाश महातेकरांना मंत्रिपद मिळाल्याने भुसावळात जल्लोष

अविनाश महातेकरांना मंत्रिपद मिळाल्याने भुसावळात जल्लोष

bhusawal jallosh
bhusawal jallosh

bhusawal jallosh

भुसावळ प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अविनाश महातेकर यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याबद्दल भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रिपाईतर्फे मिठाई वाटप व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
रिपाईचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवा विद्यार्थी कार्यकर्ता रोहन सूर्यवंशी यांच्याहस्ते फटाके फोडून मिठाई वाटप करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव, पप्पू सुरडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळू सोनवणे, जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ सुरवाडे, बंटी रंधे, आनंद सूर्यवंशी, बंडू देशमुख, भगवान निरभवणे, भिमराव वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound