रावेर येथे ईव्हीएमविरोधात घण्टानाद आंदोलन

de75795e 4e43 4b3d 9cc1 aa2bf5ee8599

रावेर (प्रतिनिधी) आज (दि.१७) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला ईव्हीएमसंदर्भात जागृत करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात घण्टानाद आंदोलन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात निकालात मतांची तफावत जाणवली असून या संबधी सर्व राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. बहुजन आघाडीतर्फे राज्यभर जिल्हा कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसिल कार्यालय येथे आज घण्टानाद आंदोलन केले गेले.

 

यावेळी एक निवेदन तहसीलदार उषारानी देवगुणे यांना देण्यात आले. आंदोलनात तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, सचिव महेश तायड़े, उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, सरचिटणीस राजकुमार इंगळे, सलीम शहा, एम.आय.एम.चे तालुकाप्रमुख वसिमभाई, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विजय अवसरमल, दिलीप कांबळे, प्रशांत बोरकर, नितिन अवसरमल, सुनील कोंघे, मुबारक तड़वी, शेख अकबर, कुंदन तायड़े, आकाश शिरसाळे, काशिबाई पाटील, भीका राजपूत, किरण तायड़े, राजेंद्र अवसरमल, राजेश रायमडे, सुरेश ठाकने, सुनील तायड़े, नितिन लहासे, किशोर भीवा तायड़े, सुरेश तायड़े व महेंद्र तायड़े उपस्थित होते.

Protected Content