Home Cities अमळनेर वर्ल्ड कप फायनलचे भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण !

वर्ल्ड कप फायनलचे भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण !

0
35

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | क्रिकेट विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्याचे उद्या जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या आवारात भव्य स्क्रीनवर मोफत प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.सदर सामना अमळनेरकराना सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी याला भव्य स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. अमळनेर येथील डॉक्टरांचे इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए,अमळनेर),क्रिकेट शौकिनांचा ग्रीन अमळनेर ग्रुप आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे.तरी क्रिकेट शौकिनानी याचा आनंद घ्यावा असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए,शाखा अमळनेर ),ग्रीन अमळनेर ग्रुप व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound