Home क्राईम कापड विक्रेत्याची दुचाकी लांबविली

कापड विक्रेत्याची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीरामपेठ परिसरातून एका कापड विक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित सुरेशकुमार डाहारा (वय-३५) रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कापड विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता सुमित डाहारा हा दुचाकी (एमएच १९ डीई ३२६६) दुचाकीने जळगावातील बळीराम पेठ येथे आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound