अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुकयातील अंतुर्ली गावातील २३ वर्षीयत तरूणाने शेतातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळनजक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयेश शरद पाटील (वय-२३) रा. अंतुर्ली ता.अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे जयेश पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मुरलीधर आनंदा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील अगोने करीत आहेत.