Home क्राईम दाम्पत्यासह मुलाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण

दाम्पत्यासह मुलाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण

0
44


धरणगाव पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्यास समजाविण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला शिवीगाळा करून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव शहरातील पारधी वाडा येथे घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील पारधी वाडा येथे भरत पारधी हे पत्नी व मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला आहे. गुरूवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एकजण दारू पिऊन गल्लीत शिवीगाळ करत होता. त्यावेळी भरत पारधी हे त्यांची पत्नी चंदाबाई  आणि त्यांचा मुलगा समजविण्यासाठी गेले. याचा राग आल्याने सुदाम जानकीराम पारधी, छोटू जानकीराम पारधी, पिंटू जानकीराम पारधी, ज्योती विजय पारधी, ललीता जानकीराम पारधी, आशाबाई जानकीराम पारधी, रत्नबाई जानकीराम पारधी, उषाबाई पारधी, अनिता सागर पारधी, ताई जानकीराम पारधी आणि विजय पारधी  सर्व रा. पारधी वाडा, धरणगाव यांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर भरत पारधी यांची पत्नी चंदाबाई पारधी यांनी धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound