बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंत्रणा संक्षमीकरणची, विस्तारीकरणाची आणि पायाभूत विकासाची संपूर्ण कामे ही महावितरणने निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसारच व्हावीत.तसेच कामाच्या गुणवत्तेसी कोणत्याच पातळीवर तडजोड स्विकारल्या जाणार नाही असे प्रतिपादन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले.
विद्युत भवन अकोला येथे महावितरणचे पायाभूत आराखडा विभाग आणि परिमंडलात आर.डी.एस.एस. योजनेचे काम करणारी अशोका बिल्डकॉन या एजन्सीच्या कर्मचार्यांसाठी आयोजित संयुक्त कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा अनिल वाकोडे,अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट,कंत्राटदार एजन्सीचे प्रकल्प व्यवस्थापक शैलेश माटकर,आणि कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून सागर आष्टनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढील दहा वर्षाचा विचार करून परिमंडलात वीज यंत्रणेच्या विस्तारीकरणाची आणि सक्षमीकरणाची अनेक कामे प्रस्तावित केलेली आहे.आर.डी.एस.एस. योजना ही याचाच भाग असून या योजनेत परिमंडलात २६२ कोटी खर्च करून १७८ कृषी वाहिन्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वीज यंत्रणेची कामे करतांना वापरत असलेले साहित्य आणि कामाची पध्दत महावितरणने निश्चित केलेल्या दर्जानुसारच करण्याकरीता अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांच्या पुढाकाराने या कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते.
मेथड ऑफ कंन्स्ट्रक्शनचे सादरीकरण ;
वीज क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान,कामाचे बदलते तपशील लक्षात घेऊन कामाची गुणवत्ता,सुरक्षितता आणि स्टँडर्ड मेथड ऑफ कंन्स्ट्रक्शन कसे असावे याबाबत या कार्यशाळेत अभियंता आष्टनकर यांच्याकडून तपशीलवार सादरीकरन करून माहिती देण्यात आली.
नियंत्रण अधिकारी आणि जबाबदारी ;
वीज खांबासाठी करण्यात येत असलेला गड्ड्यापासून तर साहित्याचा दर्जा तपासण्याची जबाबदारी नियंत्रण अधिकारी यांची आहे.तसेच वेळीच निदर्शनास आलेले डिफेक्ट एजन्सीच्या लक्षात आणून देणे,याशिवाय कामाची गुणवत्तेची पडताळणी करूनच काम पूर्ण करण्याबाबत रिपोर्ट देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गुणात्मक कामासाठी कार्यशाळेचे आयोजन;
परिमंडलात भविष्याच्या दृष्टिकोणातून अनेक भरीव कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.त्यामुळे ती कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्या पुढाकाराने पायाभूत आराखडा विभागाचे अभियंते आणि कंत्राटदार एजन्सीकडे काम करणारे अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त कार्यशाळा घेऊन प्रत्येकांना करावयाच्या कामाबाबत आणि जबाबदारीबाबत या कार्यशाळेत सादरीकरणाव्दारे तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा अनिल वाकोडे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार अतीरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे यानी मानले.