राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार जाहीर

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त मराठीतून प्रकाशित झालेल्या विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केले आहेत.

स्व. दलिचंद बस्तिमल सांखला यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार लासलगाव जि. नाशिक येथील कवयित्री प्रा. डाॅ. प्रतिभा जाधव यांच्या ‘संवाद श्र्वास माझा’ या काव्य संग्रहास तसेच विशेष काव्य पुरस्कार देगलूर जि. नांदेड येथील बालकवी संकल्प जीवनराव शिंदे याच्या ‘अंकुर’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

puraskar prapt sahitya

स्व सौ.जिसकुँवर भगवानसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार लवारी (उमरी) जि. भंडारा येथील दिवाकर मोरस्कर यांच्या चुलबंद की नारी ॠतुजा या कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे. स्व सौ.जशोदाबाई कालुसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार विभागून देण्यात आला असून यात नाशिक येथील संजय गोराडे यांच्या निर्णय या कथा संग्रहास तसेच उमरोळी जि. पालघर येथील सुनील मंगेश जाधव यांच्या मन भुकेत रंगल या कथा संग्रहास जाहीर करण्यात आला आहे.
श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व. राजेंद्र राणीदान जैन यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय शब्ददीप पुरस्कार मालेगाव जि. नाशिक येथील डाॅ विनोद गोरवाडकर यांच्या ऐसी अक्षरे या ललित लेख संग्रहास जाहीर करण्यात आला.
स्व. दामू वासनकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय बालकाव्य पुरस्कार शिरूरकासार जि. बिड येथील विठ्ठल जाधव यांच्या उंदरीन सुंदरीन तर मुक्ताईनगर जि. जळगाव येथील दीपध्वज कोसोदे यांच्या पिंपळाचं झाड या बालकाव्यसंग्रहांना जाहीर करण्यात आले आहे. स्व. सर्जेराव पाटील यांच्या स्मरणार्थ सूर्योदय गझल पुरस्कार वसमत रोड जि. परभणी येथील अरविंद सगर यांच्या गझल माणसांची या गझल संग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. गिरिजा कीर सूर्योदय कथा पुरस्कार नाशिक येथील किरण सोनार यांच्या हजार धागे सुखाचे या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे.

सूर्योदय शब्दमाऊली पुरस्कार रायपूर (छ.ग) येथील कल्पना चौधरी यांच्या सूर या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

प्रा डाॅ उषा सावंत, माया दिलीप धुप्पड, साहेबराव पाटील, डी. बी. महाजन, प्रवीण लोहार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पुरस्कार प्रदान सोहळा २०२१ मध्ये नाशकात करण्यात येणार आहे.

Protected Content