Home आरोग्य भडगाव भाजप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

भडगाव भाजप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
30

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवाड्याच्या अंतर्गत आज शासकीय विश्रामगृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा म्हणून साजरा करायचे अवाहन भारतीय जनता पार्टीने केले होते. त्याचाच एक भाग म्हणून भडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ५३ स्वयंसेवकांनी स्वच्छेने रक्तदान केले.

या शिबिरातील काटेकोर आरोग्य मुल्यमापनानंतर ५३ स्वयंसेवक रक्तदानासाठी पात्र ठरले. या जीवरक्षक उपक्रमात दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल प्रत्येक रक्तदात्याला जळगावच्या रेडप्लस ब्लड सेंटरने प्रमाणपत्र दिले.

यावेळी पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, भाजप जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, मार्केट कमिटी संचालक तथा रक्तदान शिबीर संयोजक लखिचंद पाटील, तालुका उपाध्यक्ष श्रावण लिंगायत, रतिलाल पाटील, सैनिक आघाडी तालुकाध्यक्ष समाधान पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, शहराध्यक्ष विशाल चौधरी, शक्तीकेंद्र प्रमुख भगवान पाटील, जगदिश पाटील, कजगाव शहराध्यक्ष रवींद्र पाटील, ग्रा. पं. सदस्य अक्षय मालचे, तांदुळवाडी सरपंच नकुल पाटील, विश्वनाथ भोई, लक्ष्मण पाटील, विशाल पाटील, विकास पाटील, अनील पाटील, कुणाल पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound