रावेरात ‘शेतकरी आक्रमक’; पिक विम्यासाठी महामार्गवर ‘रास्तरोको’

सुमारे एक तास रोखुन धरला अंकलेश्वर-बुरहानपुर महामार्ग

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी पिक विम्याची तसेच सिएमवी रक्कम त्वरीत मिळावी तसेच सिएमवीला पिक विमा योजनेत सामावेश करा इत्यादी मागण्यासाठी रावेरात शेतकरी आक्रमक झाले होते. शेतक-यांनी सुमारे एक तास अंकलेश्वर-बुरहानपुर महामार्ग रोखुन धरला यामुळे महामार्गावर प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अखेर प्रशासनाच्या मध्यस्ती नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत विमा कंपनीला आठ दिवासाची मुदत देण्यात आली आहे.

येथील अंकलेश्वर-बुरहानपुर महामार्ग शेतक-यांनी  सुमारे एक तास महामार्ग रोखुन धरला. यावेळी  आमदार शिरीष चौधरी, प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्रा अध्यक्ष अनिल चौधरी, कृषी उपन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, ओबीसी बाजार समिती संचालक पांडुरंग पाटील, जयेश कुयटे, गणेश महाजन, डॉ राजेंद्र पाटील, योगिराज पाटील, माजी सभापती निळकंठ चौधरी, सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष प्रवीण पंडी,त सुरेश पाटील, जिजाबराव पाटील, कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, माजी पं.स. सदस्य दिपक पाटील,  विनोद पाटील, डी.डी. वाणी, राहुल महाजन, जितु पाटील, गणेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने  शेतकरी आंदोलनाला उपस्थित होते.

 

प्रशासनाच्या मध्यस्थी नंतर आंदोनल मागे

आक्रमक शेतक-यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर शेतकऱ्‍यांच्या खात्यावर येत्या ८ दिवसात पिक विमा रक्कम कंपनीतर्फे वर्ग करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जळगाव येथून उपविभागीय कृषी अधिकारी सूरज जगताप, तंत्र अधिकारी दिपक ठाकुर उपस्थित होते. तर निवेदन तहसीलदार बंडू  कापसे यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनाला पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी चोख बंदोबस्त ठेवले होता.

Protected Content