मान्यवरांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून केले माल्यार्पण
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्त्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान नारा देणारे हरितक्रांतीचे नेते यांची संयुक्त जयंती मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने आज साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थितांनी या आदर्श नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आदरांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी डॉक्टर जगदीश दादा पाटील, सदस्य प्रदेश काँग्रेस अरविंद गोसावी प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र, काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा मनीषा कांडेलकर, गुलाबराव महाराज जिल्हा उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग, तालुका सेवादल अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील, बि.डी. गवई साहेब जिल्हा उपाध्यक्ष एस.सी. विभाग, राजेंद्र जाधव तालुका कार्याध्यक्ष तथा शहराध्यक्ष मुक्ताईनगर, निखिल चौधरी तालुकाप्रमुख ओबीसी विभाग,एस सी विभाग तालुकाध्यक्ष भाऊराव बोदडे व जनार्दन बोदडे, बाळू भाऊ काचकुटे, यासीन मनियार, भावेश काचकुटे,आरीफ रब्बानी, आनंदा कोळी व बहुसंख्य काँग्रेस प्रेमीच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.