Home क्राईम दुदैवी घटना : अपघातात महिलेचा मृत्यू; पित्यानंतर चिमुकल्याचे मातृछत्रही हरपले

दुदैवी घटना : अपघातात महिलेचा मृत्यू; पित्यानंतर चिमुकल्याचे मातृछत्रही हरपले

0
68


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद फाट्याजवळ दुचाकीने जात असतांना रस्त्यात अचानक कुत्रा समोर आल्याने ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी घसरून पडल्याने ३० वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना शनिवार ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. चित्राबाई शालीग्राम पाटील (३०, रा. ताडेपुरा, अमळनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चित्राबाई शालीग्राम पाटील (३०, रा. ताडेपुरा, अमळनेर) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चित्राबाई पाटील ह्या मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने म्हसावद फाट्याजवळून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा समोर आला. त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यात दुचाकी घसरल्याने चित्रबाई या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. चित्राबाई यांचे पती शालीग्राम पाटील यांचे दोन महिन्यापुर्वीच निधन झाले होते. दोन महिल्यापुर्वीचे पितृछत्र हरविलेल्या दोन्ही मुलांचे आता मृतछत्रही हिरावले गेले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound