रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉपनजीकच्या रस्त्यावर आईसक्रीमची गाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकावर रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रामानंद नगर पोलीसांनी कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश अहिरे हे रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाबळ परिसरात पेट्रोलिंक करत होते. त्यावेळी परिसरातील नवजीवन सुपर शॉपनजीक आईसक्रीमचे वाहन क्रमांक (एमएच ०४ ईबी ३६३५) वरील चालक देवकरण भागीरथ पुबिया (वय-२२) रा. मुकुंद नगर, ढाके वाडी, जळगाव याने रस्त्यावर उभी केली होती.

त्यावेळी रहदारीस अडथळा निर्माण केला होता. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांचा अपघात होवून जीवीतास धोका निर्माण होईल असे वाहन लावलेले होते. दरम्यान, रामानंद नगर पोलीसांनी वाहनचालक देवकरण पुबिया याच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्यावर भादवि कलम २८३ प्रमाणे कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.

Protected Content