मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात पैसे घेऊन ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
राज्यात मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर हा प्रश्न चर्चेत आला आहे. जरांगे यांनी उपोषणाची समाप्ती केली असली तरी आरक्षणाचा लढा कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळता कामा नये अशी भूमिका ओबीसी आंदोलक आणि यासोबतच नेत्यांनी देखील घेतली आहे. आज सकाळीच चंद्रपूर येथील आंदोलकांनी उपोषण सोडले आहे. तर राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टिका करतांनाच एक धक्कादायक आरोप देखील केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणालेत की, विजय वडेट्टीवार म्हणाले की, आतापर्यंत मराठवाड्यात २८ लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी देण्यात आली. हे काम झपाट्याने सुरू आहे. दुसरीकडे आपसांत झुंजवत ठेवलं आहे आणि इकडे गुपचूपपणे सरसकट प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरू आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडेही या प्रकारचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला.