अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जोशीवाडा येथे राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून अपहरण केल्याची घटना शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात  व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडा परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत अपहरण केल्याचे समोर आले आहे. तिच्या नातेवाईक यांनी तिचा मित्रमैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु कुठलीही माहिती न मिळाल्याने तिच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री १० वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.

Protected Content